महाराष्ट्रातील गोरगरिब निर्धन रुग्णांना मोफत सवलतीत उपचार द्यावे या मागणी साठी आरोग्य मंञी मा राजेश टोपे यांना बाबा कांबळेंचे साकडे
पुणे/प्रतिनिधी:श्री.संतोष आमले
महाराष्ट्र राज्यात सध्या कोरोना चा प्रकोप प्रचंड प्रमाणात वाढत असून सर्वसामान्यां माणूस कोरोना व इतर व्याधी आजार रोगराई यांमुळे हवालदिल झाला आहे यातचं गेली सहा महिण्यांपासून महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात कठोर डाऊन आमलबजावणी प्रक्रिया शासन प्रशासन पातळीवर राबविण्यात आल्यामुळे महाराष्ट्रातील कोट्यावधी लोक आज बेरोजगारीचा उपासमारीचा सामना करित आहे यातच लोकांकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नसल्यामुळे लोक सर्व बाजूने व्यतित ञस्त झाले आहे
सर्वसामान्यांना जगणे मुश्कील झाले आहे व महाराष्ट्रातील सर्वोत्परी सर्वच जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील धर्मादाय रुग्णालय , खाजगी रुग्णालये , शासकीय रुग्णालये , व सर्वोत्परी कोविड रुग्णालये , तात्पुरते कोविड रुग्णालये यात सर्वसामान्यांची उपचार घेणे कामी प्रचंड फरफट होत आहे आर्थिक शोषणाच्या माध्यमातून उपचार देण्या वरुन ताळमेळ दिसत नाही सगळीकडे फक्त पैशाची लुटमार सुरु आहे व गोरगरिब कष्टकरी मजूर घटकातील सर्वसामान्यांना याचा मोठा फटका बसत असल्यामुळे कष्टकरी कामगार पंचायत व ! महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे, यांनी अतितातडीने महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंञी मा श्री राजेश टोपे साहेब यांची पुण्यात प्रत्यक्ष भेट घेऊन महाराष्ट्रातील गोरगरिब गरजू निर्धन व मध्यम वर्गीय लोकांचा समुह आज उपचाराच्या माध्यमातून केवळ पैशासाठी कसा वेठीस धरला जात आहे याची विश्लेषणात्मक माहिती दिली तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील सर्वोत्परी रुग्णालयांत मागेल त्याला मोफत व सवलतीत उपचार देण्यात यावा यासाठी प्रभावी उपाययोजना व काठेकोर आमलबजावणी करण्यात सक्रियता आना तसेच आजवर सहा महिण्यात ज्या गोरगरिब निर्धन आर्थिक दुर्बल घटक व मध्यम वर्गीय ज्या ज्या रुग्णांना सर्वोत्परी ज्या ज्या रुग्णालयांनी उपचार देण्यासाठी टाळाटाळ केली आहे व वेठीस धरुन आर्थिक शोषण केले आहे याची सर्व सखोल चौकशी करुन संबंधित दोषी रुग्णालय व प्रशासनावर व प्रशासनातील दोषी अधिकारी कर्मचारी यांचेवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच लुटमार झालेल्या आर्थिक शोषण झालेल्या घटकातील रुग्णांकडून बेकायदेशीर रित्या अतिरिक्त सक्तीने वसूल झालेल्या पैशाचा ठरावीक शुल्क रक्कम वजावटीतून ज्यादा लुटमार केलेला पैसा परताव्यासह सन्मानाने रुग्ण व रुग्णाच्या नातेवाईक यांना परत करण्याचे नियोजन सक्रियपणे करावे अशा विविध रुग्णांच्या हितार्थ विविध मागण्या कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी व सामाजिक कार्यकर्ते मा अजय लोंढे यांनी आरोग्य मंञ्याकडे करुन सदर मागण्यांची तातडिने सोडवणूक व्हावी यासाठी साकडे घातले तसेच महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य मंञ्यांनी तातडीने दख्खल घेऊन सदर मागण्यांचा विचार करुन सकारात्मक भूमिका म्हणून प्री आॕडिट व इतर कारवाई संदर्भातील योग्य सुचना संबधीतांना देऊन निश्चितच सुधारणा करु आसा विश्वास दिला आहे रुग्ण सेवे संदर्भी जागृती व सामाजिक कामाबद्दल बाबा कांबळें यांचे आरोग्य मंञी मा राजेश टोपे यांनी विशेष कौतुक केले .