कामोठे शिवसेना उपमहानगर प्रमुख श्री. प्रभाकर गोवारी यांच्या मार्गदर्शनाखाली परिवहन महामंडळ, पनवेल आगाराचे व्यवस्थापक यांना शिवसेना कामोठे शहरातर्फे निवेदन देण्यात आले.
पनवेल / पनवेल : कामोठे शहरातील त्याचप्रमाणे पनवेल विभागातील असंख्य नोकरदार वर्ग आपल्या उदरनिर्वाहासाठी दररोज मुंबई येथे ये जा करत असतो. परंतु गाड्यांच्या संख्या अभावी कित्येक नागरिकांचे दररोज हाल होत आहे. सदर बाब आपल्या कामोठे शहरातील श्री. दशरथ अर्जुन यांनी निदर्शनास आणून दिली असता त्यावर पनवेल ते मंत्रालय तसेच मंत्रालय ते पनवेल बस फेर्या वाढविण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, पनवेल आगाराचे व्यवस्थापक यांना शिवसेना कामोठे शहरातर्फे निवेदन देण्यात आले. यावेळी श्री. प्रभाकर गोवारी (उपमहानगर प्रमुख), श्री. नागसेन मोरे (उपशहर प्रमुख), श्री. राहुल बुधे (उपप्रभाग अधिकारी), श्री. किरण मोरे (शिव अवजड वाहतुक सेना शहर अध्यक्ष), श्री दिगंबर पाटिल (मा. उपशाखा प्रमुख लालबाग) व श्री. सुनील जुवाटकर
लकित रामकृष्ण सोडेवाले
शिवसेना उपशहरप्रमुख कामोठे
भारतीय कामगार सेना कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते