महावितरण कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक श्री. गोविंद बोडके यांची भांडूप परिमंडलात अधिकाऱ्यासमवेत बैठक.कोणत्याही ग्राहकाचा वीज पुरवठा खंडित न करता, वीज बिलाची थकबाकी वसुली करण्याचे उद्धिष्ट अधिकाऱ्यांना दिले
भांडूप, दि:१८/०९/२०२०
महावितरण कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक श्री. गोविंद बोडके यांनी भांडूप परिमंडल कार्यालयात भेट देऊन भांडूप परिमंडल अंतर्गत ठाणे, वाशी व पेण या तिन्ही मंडल कार्यालयातील वसुली तसेच इतर महत्वाच्या कामाचा आढावा घेतला.
यावेळी श्री. बोडके यांनी उच्चदाब तसेच घरगुती, व्यवसायिक व औद्योगिक ग्राहकांच्या वीजबिल वसुलीबाबत आढावा घेतला तसेच थकबाकी असलेली रक्कम वसूल करण्यासाठी अभियंत्यांनी ग्राहकांच्या सोसायटी मध्ये जाऊन वीज बिलाबाबत माहिती द्यावी तसेच वीज बिल भरण्यासाठी आग्रह करावे. तसेच, ४०–२००अँम्पियर चे जुने व नादुरुस्त झालेले वीज मीटर बदलण्यात यावे. २० के डब्ल्यू च्या वरती भार असणाऱ्या ग्राहकांचे योग्य पद्धतीने रीडिंग घेण्यासाठी श्री बोडके यांनी सूचना केल्या. भांडूप परिमंडल अंतर्गत सुरु असलेल्या स्वच्छता अभियानाचा आढावा घेतला व स्वंयमस्फुर्तपणे विविध कार्यालयात सुरु असलेल्या स्वच्छता अभियानाबाबत त्यांनी कौतुक केले. स्वच्छता मोहीम राबवून कार्यालयात नादुरुस्त असलेले साहित्य काढून कार्यालयाचा परिसराला सुंदर व स्वच्छं ठेवावे अशा सूचना केल्या.
महावितरणच्या कर्मचारी व अभियंत्यांनी चांगली ग्राहक सेवा देण्यासाठी तत्पर राहावे. ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करावे व त्यांना नवीन वीज जोडणी वेळेत होईल याची दक्षता घ्यावी. याशिवाय, एप्रिल ते ऑगस्ट पर्यंत असलेल्या ग्राहकांच्या वीज देयकाची थकबाकी वसूल करतांना एकही ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित न करता, १००% वसुली करण्याचे उद्धिष्ट श्री.बोडके यांनी दिले.
या बैठकीनंतर, भांडूप परिमंडल कार्यालयाचा आवारात असलेल्या स्काडा सेंटरची पाहणी श्री. बोडके यांनी केली. तसेच स्काडा सेंटरला पूर्णपणे कार्यन्वित करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याची सूचना अधीक्षक अभियंता ठाणे श्री अरविंद बुलबुले यांना दिले.सदर बैठकीस भांडूप परिमंडलचे मुख्य अभियंता श्री. सुरेश गणेशकर, कोकण प्रादेशिक विभागाचे अधीक्षक अभियंता (संचलन) श्री. अनिल घोगरे, ठाणे मंडळाचे अधीक्षक अभियंता श्री. अरविंद बुलबुले, वाशी मंडळाचे अधीक्षक अभियंता श्री. राजाराम माने, पेण मंडळाचे अधीक्षक अभियंता श्री. दीपक पाटील, कोकण प्रादेशिक विभागाचे महाव्यवस्थापक (वि.व.ले) श्री.अनिल बऱ्हाटे, उपमहाव्यवस्थापक (माहिती.तंत्रज्ञान) श्री योगेश खैरनार, भांडूप परिमंडलचे सहाय्यक महाव्यवस्थापक (वि.व.ले) श्री. प्रवीण रहांगदळे, तसेच कार्यकारी अभियंता (प्रशासन) श्री. देवेंद्र उंबरकर, स्काडा सेंटरचे अतिरिक्त कार्यकरी अभियंता श्री. लोखंडे व इतर अधिकारी उपस्थित होते.