पोदी गाव नंबर २ येथे पनवेल महानगरपालिकेने कोणतेच नूतनीकरण व तात्पुरती डागडुजी न करण्याची क्रांतिज्योत महिला विकास फाऊंडेशनची मागणी
पनवेल दि.23 (वार्ताहर)-पोदी गाव नंबर २ येथे पनवेल महानगरपालिकेने कोणतेच नूतनीकरण व तात्पुरती डागडुजी न करण्याची मागणी क्रांतिज्योत महिला विकास फाऊंडेशनने पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनातक्रांतीज्योत महिला विकास फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. रुपालिताई शिंदे यांनी म्हटले आहे की, पनवेल महानगर पालिका हद्दीतील नवीन पनवेल येथील पोदी गाव २ येथील बरेच वर्षांपासून रस्ते बांधणीची, ड्रेनेज पाईपलाईन ची अर्धवट कामे रेंगाळली आहेत व जी कामे मनपानी टेंडर पास करून दिले ते पूर्ण झाले नाहीत. जी कामे योजनेअंतर्गत व निधी मधून करण्यात आली, ती अर्धवट केली असून पोदी ग्रामस्थांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. आम्ही गावकऱ्यांनी पाय वाट सोडलेल्या जागेवर ही टेंडर काढून पमपाने मनमानी कारभार केला आहे. तरी आपण ह्याकडे लक्ष देऊन ह्याची सखोल चौकशी करावी व ज्यांनी ह्या कामांमध्ये दिरंगाई करून आम्हा ग्रामस्थांची दिशा भूल केली त्यावर आपण योग्य ती कारवाई करावी. सदर पोदी गाव नंबर २ याठिकाणी कोणत्याही नूतनीकरणाचे काम मनपाने करु नये अशी विनंती आपल्याकडे पत्राद्वारे करीत आहे. लवकरात लवकर योग्य तो निर्णय घ्या. अशी मागणी क्रांतीज्योत महिला विकास फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. रुपालिताई शिंदे यांनी पनवेल महानगरपालिकेला केली आहे.