सुहासिनी नायडू युवती अध्यक्षा
भाजपा यांनी साचलेले पाणी निचरा करण्यासाठी यंत्रणा लावावी आयुक्ताकडे केली मागणी
नवी मुबई /वार्ताहर : 23 तारखेच्या मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने नवी मुंबईला झोडपून काढले आहे. दिवसभर देखील पाऊस सुरुच असल्याने नेरुळ सेक्टर 2 व 4 येथील वारणा सोसायटी व आम्रपाली सोसायटीत कंबरेइतके पाणी भरले आहे. या दोन्ही बैठ्या सोसायट्या असल्याने नागरिकांच्या घरात पाणी जाऊन वस्तूंचे नुकसान झाले आहे. पहाटे तुन वाजल्यापासून नागरिक जागे असून घरातील पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. तरी कृपया आपण या बाबीची दखल घेत तातडीने घनकचरा विभागातील यंत्रणेला आदेश द्यावेत. पाणी निचरा करण्याची यंत्रणा राबवून य दोन सोसायट्यांतील नागरिकांना दिलासा द्यावा सुहासिनी नायडू यांनी पत्रा द्वारे नवी मुबई महानगरपालिका आयुक्तांना केली विनंती