बी. एम. टी. सी. कामगारांना लवकरच मिळणार न्याय बबनदादा पाटील यांची मध्यस्थी ठरली मोलाची
वार्ताहर: आज गुरुवार दिनांक ०८.१०.२०२० रोजी सायंकाळी ०५.०० वाजता सिडको भवन बेलापूर येथे *सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक मा श्री संजयजी मुखर्जी साहेब यांच्या समवेत पनवेल उरण महाविकास आघाडी दिवंगत दि.बा.पाटील स्थानिक प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती अध्यक्ष मा श्री बबनदादा पाटील* *मा श्री राजनजी विचारे खासदार ठाणे लोकसभा*, *मा श्री मनोहर भोईर माजी आमदार मा श्री महेंद्रशेट घरत समिती उपाध्यक्ष मा श्री सुदाम पाटील सचिव समिती* *मा श्री गोपाळ भगत नगरसेवक* *मा श्री रविशेट पाटील*. सोबत चर्चा केली यामध्ये सिडको हद्दीतील गावांतील सर्व्हे लवकरात लवकर करून रायगड,ठाणे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत सुरू करण्यासाठी लेखी पत्र देऊन तात्काळ सुरू करणार असल्याचे सांगितले व गरजेपोटी बांधलेली घरे जिथे आहेत त्या परिस्थितीत तिथे तोडक कारवाई करणार नसल्याचे सांगितले
त्याचप्रमाणे नैना प्रकल्पग्रस्तांची बैठक पुढील आठवड्यात त्यांच्या दालनात घेणार असल्याचे सांगितले व बी एम टी सी कर्मचाऱ्यांचा प्रश्न अंतिम टप्प्यात असल्याने तो ही निकालात काढण्यात येणार असल्याचे त्यांनी वरील शिष्टमंडळास सांगितले व कारडीओ रुग्णवाहिका या भाड्याने न घेता त्या विकत घेण्याचे मान्य केले,तळोजा औद्योगिक वसाहतीतील प्रदूषणामुळे होणाऱ्या दुर्गंधीने नागरिक हैराण असल्याने तेथील भागासाठी आरोग्य केंद्र उभारण्याची मागणी समितीने सिडकोकडे केली आहे तसेच लवकरच कोविड रुग्णालय ही जनतेच्या सेवेसाठी लोकार्पण करण्याचे आश्वासन मा श्री मुखर्जी साहेबांनी दिले
धन्यवाद.
आपला,
श्री सुदाम पाटील
सचिव
पनवेल उरण महाविकास आघाडी