अल क्वुड्स ( al – Quddus ) चारिटेबल ट्रस्ट तळोजा तर्फे रोहीजणं गावातील सर्व मंदिरात मोफत सॅनिटाईझ व स्टॅन्डचे वाटप.
तळोजा / वार्ताहर: रोहीजणं गावातील सर्व मंदिरात अल क्वुड्स ( al – Quddus ) चारिटेबल ट्रस्ट तलोजे फेज 1 या संस्थेच्या माध्यमातुन मुस्ताक आंतुले ,आरिफ दखावे ,ईलीयास शेख ,नझीम शेख नाझीर याहो , परवेज सुर्वे , अतिख अहमद ,डॉ.हसन ,तरबेज अंतुले ,मुदसर दखावे अख्तार शेख , संगिता ठाकुर यांच्या वतीने सचिन तांबे पि.आर.पि.युवा रायगड जिल्हा आध्यक्ष प्रशांत गायकर , सारंग पाटील ,अभिषेक पाटील , तगदिर पाटील यांच्या सहकार्याने रोहिंजण येथील दुर्गामाता मंदिर ,राधाकृष्ण मंदीर , वाघेश्वर मंदीर ,वेशीमाता मंदीर , कुलदैवत मंदीर ,जागृतेश्वर मंदिर येथील मंदिरांमध्ये भाविकांचे आरोग्य कोरोणा वायरस या आजारा पासुन सुरक्षितराहावे व कोरोनाचा पसार होऊ नये या साठी सॉनिटायझर व स्डँड बसविण्यात आले या वेळी रोहिंजण गावातील ग्रामस्थांतर्फे संगिता ठाकुर व अल – क्वीड्स च्या सर्व टिमचे आभार मानले व या सामाजिक कामाचं सर्व स्थरातून कौतुक होत आहे