परिवर्तन सामाजिक संस्थेच्या लढ्याला यश सिडको सुरू करणार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यासून कामाला सुरूवात
पनवेल, दि.21 (वार्ताहर) ः खांदा वसाहतीमध्ये महानगर गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी खोदलेले रस्ते अद्यापपर्यंत दुरुस्त करण्यात आले नव्हते. त्यामुळे या विरोधात परिवर्तन सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महादेव वाघमारे यांनी अन्नत्याग करण्याचा इशारा दिला होता. या इशार्याची दखल घेत सिडकोने नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरूवात करतो असे लेखी आश्वासन दिल्याने त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे.
खाांदा वसाहतीमध्ये महानगर गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी खोदलेले रस्ते अद्यापपर्यंत दुरुस्त केले नव्हते. या संदर्भात महादेव वाघमारे यांनी संस्थेच्या माध्यमातून अन्नत्याग करण्याचा इशारा दिला होता. या आंदोलनाची दखल घेत सिडकोचे कार्यकारी अभियंता (पनवेल-1) एम.एच.मुलानी यांनी त्यांना आंदोलन मागे घेण्यासंदर्भात पत्र देवून येत्या नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून प्रत्यक्ष कामाला सुरूवात करतो. तसेच सद्यस्थितीत खड्ड्यांची तात्पुरती डागडुजी करतो असे लेखी आश्वासन दिले आहे. सदर आश्वासन न पाळल्यास पुन्हा 10 नोव्हेंबरला परिवर्तन सामाजिक संस्था सिडको विरोधात थाळीनाद आंदोलन करेल असा इशारा सुद्धा महादेव वाघमारे यांनी सिडकोला दिला आहे.