सराईत गुन्हेगाराला झडप घालून पोलिसांनी पकडले
पनवेल, दि.3 (वार्ताहर) ः एका सराईत गुन्हेगाराला तसेच त्याला दोन वर्षासाठी हद्दपार केले असतानाही पनवेल परिसरात फिरत असताना मिळून आल्याने गुन्हे शाखा कक्ष 2 च्या पथकाने झडप घालून पकडले आहे.
गुन्हे शाखा कक्ष 2 चे सपोनि कराड, सपोनि गायकवाड, सपोनि ढोले, पो.हवा.साळुंखे, पो.हवा.पवार, पो.हवा.गडगे, पो.हवा.पाटील, पो.ना.कुदळे, पो.ना.कानु असे पथक पनवेल परिसरात गस्त घालीत असताना पोलीस हवालदार साळुंखे यांना खास बातमीदाराकडून माहिती मिळाली की, पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ठाणा नाका परिसरात पनवेलसह नवीमुंबई, रायगड व ठाणे अशा जिल्ह्यातून हद्दपार केलेला गुन्हेगार जाहिद मुस्तफा पावले (28 रा.पटेल मोहल्ला) हा फिरत आहे. त्यानुसार तातडीने गुन्हेगारांचे कर्दनकाळ असलेले पो.हवा.सचिन पवार यांनी त्या भागात धाव घेवून झडप घालून सदर आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पो.का.कलम 142 प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.