समुद्र खलाशांचे प्रश्न तसेच स्थानिक मच्छीमार बांधवांना मार्गदर्शन करण्यासाठी संस्थेच्या कार्यालयाचा उपयोग होणार- अध्यक्ष संजय पवार
पनवेल/ वार्ताहर: दि.10 (वार्ताहर)-समुद्र खलाशांचे प्रश्न, विदेशात संकटात असलेल्या सिफेरर्सना मदत वस्थानिक मच्छीमार बांधवांसाठी एलईडी फिशींग आणि समुद्र प्रदुषण यासंदर्भात माहिती संस्थेच्या नवीन कार्यालयामधून मिळणार असल्याने त्याचा उपयोग आपल्या बांधवांना होणार असल्याचे प्रतिपादन ऑल इंडिया सी फेरर्स अन्ड जनरल वर्कर्स युनियनच्या नवीन विभागीय कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्ष संजय पवार यांनी केले. नवी मुंबई ऐरोली येथे हे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. युनियनचे नाव देश विदेशात आहे. या नवीन कार्यालयामुळे अनेक स्थानिकांचे प्रश्न सोडविण्यास मदत होईल असेही अध्यक्ष संजय पवार यांनी सांगितले. याप्रसंगी योगेश काळे, इमरान सय्यद, नसिम शेख, नितीन भाऊ यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.