जबरी चोरीच्या २० गुन्हयात पाहिजे असणाऱ्या आरोपीतास अग्निशस्त्रासह गुन्हे शाखा कक्ष २ , नवी मुंबई कडून अटक
पनवेल दि 24.(संजय कदम):कोविड – १ ९ च्या आजाराच्या प्रादुर्भावाच्या काळातील लॉक डाउन नंतर नवी मुंबई आयुक्तालयामधुन अनेक सोनसाखळी चोरीच्या तक्रारी पोलीस ठाण्यांमध्ये प्राप्त झाल्या होत्या . त्या अनुषंगाने मा . पोलीस आयुक्त , श्री . बिपिनकुमार सिंह सो , मा . अपर पोलीस आयुक्त ( गुन्हे ) , श्री . बी.जी. शेखर पाटील साो , मा . पोलीस उप आयुक्त ( गुन्हे ) , श्री . प्रविण पाटील साो , मा . सहाय्यक पोलीस आयुक्त ( गुन्हे ) , श्री . विनोद चव्हाण सो , यांनी वेळोवेळी मिटींग घेवून सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यावर लक्ष केंदीत करून त्यांचेविरूध्द कडक कारवाई करण्याकामी गुन्हे शाखेच्या सर्व शाखांना सूचना दिल्या होत्या.विशेष पथके तयार केली होती . गुन्हे शाखा कक्ष ०२ यांनी मागील आठवडयातच सोनसाखळी चोरी करणाऱ्या टोळीला अटक केलेली आहे . त्यांचेकडून २० लाखाचे दागिन्यासह नवी मुंबई आयुक्तलयातील सोनसाखळीचे २० गुन्हे उघडकीस आणलेले आहेत . सदर टोळीतील काही सदस्य आणखीन अटक करणे बाकी असल्याने त्याच्या मागावर नवी मुंबई गुन्हे शाखा होती . गुन्हे शाखा कक्ष ०२ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री . गिरीधर गोरे यांना गोपनिय बातमीदाराकडुन माहिती मिळाली की , नवी मुंबई आयुक्तलायातील २० जबरी चोरीच्या सोनसाखळी गुन्हयातील पाहिजे आरोपी व सदर टोळीचा प्रमुख मोहम्मद शब्बीर शकिल शेख , वय २८ वर्षे , हा मागील ०२ दिवसांपासून पोलीसांची दिशाभूल करण्यासाठी मानखुर्द येथे न राहता बेलापूर , उलवा या परिसरात रिक्षा चालवित असल्याची माहिती प्राप्त झाली . सदर माहितीच्या अनुशंगाने मा . अपर पोलीस आयुक्त , गुन्हे डॉ . बी . जी शेखर पाटील यांनी आखुन दिलेल्या पध्दतीने बेलापूर व उलवा परिसरामध्ये गुन्हे शाखा ०२ वे वपोनि गिरीधर गोरे , सपोनि संदिप गायकवाड , सपोनि शरद ढोले , सपोनि प्रविण फडतरे यांची वेगवेगळी पथके तयार केली . त्या पथकामार्फत बेलापूर व उलवा परिसरात सापळा लावण्यात आला . दिनांक २३/११/२०२० रोजी नमूद २० जबरी चोरीच्या सोनसाखळी गुन्हयातील पाहिजे आरोपी व सदर टोळीचा प्रमुख मोहम्मद शब्बीर शकिल शेख , वय २८ वर्षे , हा ऑटो रिक्षा क्रमांक एम एच ४३ बीआर १५०७ सह बेलापूर गावामध्ये मिळून आल्याने त्यास तात्काळ ताब्यात घेण्यात आले . त्यावेळी त्याची अंगझडती घेतली असता त्यावे शर्टच्या आत डाव्या बाजूस कमरेजवळ एक विनापरवाना देशी बनावटीचे रिव्हाल्वर व एक जिवंत काडतूस बेकायदेशिर रित्या बाळगलेले मिळून आले . म्हणून नमूद अट्टल गुन्हेगार मोहम्मद शब्बीर शकिल शेख , वय २८ वर्षे , रा . कृष्णा भेंडे चाळ , रूम नं ७ , जुई गाव , ता – पनवेल , जिल्हा रायगड . याव्या विरूध्द् एन आर आय पोलीस ठाणे येथे भारतीय हत्यार कायदा कलम ३ , २५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे . सदरची कामगिरी मा . पोलीस आयुक्त , श्री . बिपिनकुमार सिंह सो , मा . अपर पोलीस आयुक्त ( गुन्हे ) , श्री . बी.जी. शेखर पाटील सो , मा . पोलीस उप आयुक्त ( गुन्हे ) , श्री . प्रविण पाटील साो , मा . सहाय्यक पोलीस आयुक्त ( गुन्हे ) , श्री . विनोद चव्हाण सो , यांच्या मार्गदशनाखाली गुन्हे शाखा , कक्ष ०२ , चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री . गिरीधर गोरे , सपोनि गणेश कराड , सपोनि संदिप गायकवाड , सपोनि शरद ढाले , सपोनि प्रविण फडतरे , पोहवा ४०४ / सुनिल सांळुके , पोहवा १३४३ / मधुकर गडगे , पोहवा ४२० / सचिन पवार , पोहवा ४४ / तुकाराम सुर्यवंशी , पोना २०२२ / रूपेश पाटील , पोना २०८२ / इंद्रजित कानु , पोशि ३५७७ / प्रविण भोपी , पोना ६६४ / सचिन पाटील , यांनी केली आहे .