पनवेल शहर पोलिसांनी वाहिली 26/11 मधील दहशतवादी हल्ल्यात प्राणाची आहुती दिलेल्यांना आदरांजली
पनवेल, दि.26 (वार्ताहर) ः 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या आणि दहशतवाद्यांशी दोन हात करून आपल्या प्राणाची आहुती दिलेल्या सर्वांना विनम्र आदरांजली आज पनवेल शहर पोलिसांनी वाहिली.
मुंबईत झालेल्या 26/11 च्या हल्ल्याला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र दहशतवादी हल्ल्याची भीती अद्याप मुंबईकरांच्या मनात कायम आहे. पाकिस्तानच्या दहा अतिरेक्यांनी 26 नोव्हेंबर 2008 रोजी रात्री समुद्रमार्गे दक्षिण मुंबईत प्रवेश केला होता. त्यांनी ताज हॉटेल, लिओपोल्ड कॅफे, नरिमन हाउस, हॉटेल ओबेरॉय, सीएसएमटी, कामा रुग्णालय या ठिकाणी अंदाधुंद गोळीबार केला होता. त्यामध्ये अधिकार्यांसह शेकडो निरपराध नागरिकांचे प्राण गेले तर अनेक जण जखमी झाले होते. या सर्वांना आज पनवेल शहर पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनी विनम्र आदरांजली वाहिली आहे.या वेळी संपूर्ण पोलीस कर्मचारी उपस्थित होते.