मंगळवेढा शहरातील अपघाताचे प्रमाण रोखण्यासाठी राजे प्रतिष्ठानचा पुढाकार
वार्ताहर : खबरदारी तुमची, जबाबदारी राजे प्रतिष्ठानची असे घोष वाक्य असून मंगळवेढा शहरातील अपघाताचे प्रमाण वाढले आहे ते रोखण्यासाठी राजे प्रतिष्ठान चा पुढाकार मंगळवेढा नगरपालिकेस वेळोवेळी गतिरोधक बसवण्यासाठी निवेदन देऊन सुद्धा जाणिवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. ही बाब राजे प्रतिष्ठान च्या लक्षात आल्याने राजे प्रतिष्ठान कामगार सेनेने अपघाताचे प्रमाण कमी व्हावे म्हणून वैयक्तिक स्व खर्चाने गतिरोधक बसवण्यात आलेत. नगरसेवक चंकी खवतोडे. नगरसेवक अजित आप्पा जगताप. नगरसेवक सोमनाथ बुरजे. राजे प्रतिष्ठान जिल्हाध्यक्ष सुदर्शन ताड.प्रहार संघटनेचे अध्यक्ष समाधान हेंबाडे. उमेश आवताडे.प्रदीप आवताडे.रवी लाड. समाधान पवार. व सर्व राजे प्रतिष्ठान चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.