खारघर परिसरात बेकायदेशीररित्या वास्तव्य करणार्या नायजेरियन नागरिकांवर पोलिसांची कारवाई
पनवेल, दि.7 (वार्ताहर) ः खारघर परिसरात बेकायदेशीररित्या वास्तव्य करून त्याचा त्रास परिसरातील नागरिकांना होत होता. अशा नायजेरियन नागरिकां विरोधात तक्रारी आल्याने त्यांच्या विरुद्ध खारघर पोलीस ठाण्याने विशेष मोहिम राबवित कारवाई केली.
खारघर पोलीस ठाणे येथे सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र गिड्डे व गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त विनोद चव्हाण यांच्या उपस्थितीत गुन्हे शाखेचे /पनवेल विभागातील/ पासपोर्ट विभागाचे तसेच खारघर पोलीस ठाणे कडील अधिकारी व अंमलदार असे एकूण 2 सहाय्यक पोलीस आयुक्त, 6 पोलीस निरीक्षक, 14 सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक, 60 पोलीस अमलदार, 1 आरसीपी पथक, आदींच्या बंदोबस्तात पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग, नवी मुंबई यांच्या आदेशाने व पोलीस उपायुक्त, परिमंडळ 2 पनवेल शिवराज पाटील नवी मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली कोम्बिंग ऑपरेशनसाठी खारघर पोलीस ठाणे येथे जमा होऊन येथून खारघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विशेषतः बेकायदेशीर नायजेरियन नागरिक राहत असलेल्या परिसरातील स्काय व्हॅली बिल्डिंग तसेच मॅजेस्टिक रेसिडेन्सी, आलन रेसिडेन्सी या या सेक्टर 34 मधील बिल्डिंग चारी बाजूने पोलीस बंदोबस्त लावून सदर ठिकाणी राहत असलेल्या नायजेरियन नागरिक यांचा शोध घेतला असता सदर कोम्बिंग ऑपरेशन मध्ये 06 नायजेरियन नागरिक व 03 युगांडा महिला मिळून आल्या, त्यांना ताब्यात घेऊन विदेशी नागरिकांकडे भारतात प्रवेश करण्यासाठी पासपोर्ट व राहण्यासाठीचा विजा याबाबत पासपोर्ट विभागाचे अधिकारी व अमलदार त्याने चौकशी केले असता त्यांच्याकडे भारतात प्रवेश करण्यासाठी व राहण्यासाठी कोणतीही कायदेशीर कागदपत्र नसल्याचे खात्री झाली म्हणून सदर नायजेरियन व युगांडा विदेशी नागरिक यांच्यावर खारघर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 263/2020, विदेशी व्यक्ती अधिनियम 1946 चे कलम 14( अ) सह पारपत्र अधिनियम 1967 चे कलम 12(1) (सी)प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, सदर गुन्ह्याच्या कामे सदर आरोपी त्यांना अटक करण्यात आलेले असून, पुढील कायदेशीर कारवाई करण्याची तजवीज ठेवली आहे. सदरची कारवाई शांततेत पार पडली .यापुढे हि बेकायदेशीर झोपडपट्टीवर दुकानावर व बिना पासपोर्ट राहणारे वर कारवाई कायम चालु राहणार अशी माहिती खारघर पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी ह्यांनी दिली.
