कोव्हिडच्या नियमाचे पालन करून आजची उद्य
कोव्हिड-१९ च्या नियमाचे पालन करून आजची उद्योग नगरी दिपावली विशेषांकाचे प्रकाशन नवी मुंबई पोलिस आयुक्त बिपिन सिंह यांच्या हस्ते करण्यात आले.
नवी मुंबई (प्रतिनिधि/विरेंद्र म्हात्रे) :- नवी मुंबई येथून प्रसिद्ध होणार्या आजची उद्योग नगरी वृतपत्र हे गरीब, शेतकरी, कामगार, बेरोजगार, सामजिक, दलित समजावर व महिलांवर होणार्या अन्याया विरोधात सडेतोड आवाज उठवणार्या आजची उदयोग नगरी सप्ताहिक वृतपत्राच्या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन नवी मुंबईचे कर्तुत्वान पोलिस आयुक्त श्री. बिपिन सिंह यांचे हस्ते कोव्हिड-१९ च्या नियमाचे पालन करून अगधी साध्या पध्तीने करण्यात आले.सदर प्रसंगी वृतपञ आजची उद्योग नगरीच्या संपादक कु. रूपाली वाघमारे, प्रकाशक कु दिपा वाघमारे पञकार उमेश खांदेकर, दै. नवाकाळ चे माजी जेष्ट
पञकार व साहित्यिक चारोळीकार मोहन वाघमारे यानांच प्रवेश देण्यात आला होता.तसेच, सदर दिपावली विशेष अंकात विविध साहित्या बरोबरच यशस्वी लोकांची माहीती, अनेक मान्यवरांचे कार्य काव्यातून नावासह केलेले कौतुक
होत आहे, तर मुडदा घरातील मुडदयांचे मनोगत, काव्यात्मक सदरी करुन खुप वाचनीय व आगळे वेगळे वाटत असल्याचे अनेकांनी सांगीतले आहे. या ६४ अंकाच्या पानांची किमंत १०० रूपये ठेवण्यात आली आसल्याची वृतपत्राची संपादीका रूपाली वाघमारे यांनी सागितले आहे.