साईसेवक तथा समाजसेवक रवींद्र पाटील यांना राजे प्रतिष्ठान कामागर सेनेतर्फे साईभक्तांचा अभिमान पुरस्काराने करण्यात आले सन्मानित.
पनवेल / प्रतिनिधी : पनवेल तालुक्यात व वहाळ परिसरातील साईसेवक तथा समाजसेवक मा. श्री. रविशेठ पाटील यांना श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे साईभक्तांचा अभिमान हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. गोर गरीब गरजवंताचा हक्काचा आधार,सामाजिक भान जागृत ठेऊन समाजासाठी दोन्ही हातांनी भरभरून देणारे दानशूर, मितभाषी विनम्र स्वभावाचे मा.श्री. रवींद्र काथोर पाटील यांनी श्री साई देवस्थान वहाळ येथील साई मंदिराच्या माध्यमातून साई भक्तांना एक हक्काचे साई सेवा केंद्र उभारून त्यांनी भक्तांच्या मनात मानाचे स्थान मिळवले आहे.साई सेवेत झोकून देत समाजकार्याची त्यास जोड देत रवीशेठ पाटील यांनी भक्तिमार्गाने देखील समाज उन्नती साधता येते याचा आदर्श वस्तुपाठ जनमानसात रुजवला. त्यांच्या अतुलनीय कार्यास मानाचा मुजरा मुजरा करून राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे साईभक्तांचा अभिमान हा पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. यावेळी नवी मुंबईचे अतिरिक्त पोलिस आयुक्त मा. श्री. बी.जी. शेखर पाटील साहेब, राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र सरचिटणीस चंद्रकांत धडके मामा, कार्याध्यक्ष प्रकाशभाई कोळी, महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक, सचिन लोखंडे, नवीन पनवेल तालुकाध्यक्ष संतोष आमले, उपाध्यक्ष विजय दुन्द्रेकर, सचिव सुरेश भोईर, पत्रकार संजय कदम, विवेक पाटील, रवी गायकवाड, ओमकार महाडिक आदी उपस्थित होते.