राजे प्रतिष्ठान कामागार सेनेचे महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी होणार साजरा!
पनवेल / प्रतिनिधी :श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र सहचिटणीस तथा पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे उपाध्यक्ष केवल महाडिक यांचा वाढदिवस 24 डिसेंबर 2020 रोजी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार आहे.
राजे प्रतिष्ठान कामगार सेना नवीन पनवेल यांच्या वतीने आदई येथील वृद्धाश्रमात वृद्धांना फळे व बिस्किटे तसेच ब्लॅंकेट वाटप करण्यात येणार आहे. दिवसभर विविध विभागात कार्यक्रमांचे आयोजन केले असल्याने श्री. केवल महाडिक सायंकाळी 5 वाजल्या पासून कापड बाजार येथील त्यांच्या कार्यालयातील कार्यक्रमांना तसेच हितचिंतकांना भेटण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.