भाजपच्या महिला आघाडीसह युवा कार्यकर्त्यांनी केला शिवसेनेत जाहीर प्रवेश
पनवेल, दि.23 (वार्ताहर) ः तालुक्यातील केवाळे गावातील भाजप महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह युवा कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यांचे स्वागत उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील यांनी केले.
यावेळी केवाळे येथील भाजप महिला आघाडीच्या सौ. अनिता साईनाथ डांगरकर व युवा कार्यकर्ते अभिलाश साईनाथ डांगरकर यांच्यासह इतर अनेकांनी भगवा ध्वज हाती घेत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यांचे पक्षात स्वागत रामदास दादा पाटील (शिवसेना उपजिल्हाप्रमूख), एकनाथ शेठ म्हात्रे (तालूकाप्रमूख) रामदास पाटील(तालूका संघटक), बबन फडके (उपतालूकाप्रमूख), शांताराम कुंभारकर (उपतालूकाप्रमूख), शशी भगत (विभागप्रमूख), दत्ता फडके (विभागप्रमूख), मनोज कुंभारकर (युवासेना विभाग अधिकारी), नितीन माळी (शाखाप्रमूख केवाळे,) केवाळे शाखेचे पदाधिकारी व शिवसैनिक आदींनी केले.
फोटो ः भाजप महिला आघाडीसह युवा कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचे स्वागत करताना रामदास दादा पाटील (शिवसेना उपजिल्हाप्रमूख), एकनाथ शेठ म्हात्रे (तालूकाप्रमूख) रामदास पाटील(तालूका संघटक), बबन फडके (उपतालूकाप्रमूख), शांताराम कुंभारकर (उपतालूकाप्रमूख), शशी भगत (विभागप्रमूख), दत्ता फडके (विभागप्रमूख), मनोज कुंभारकर (युवासेना विभाग अधिकारी), नितीन माळी (शाखाप्रमूख केवाळे,) आदी.