बँक ऑफ महाराष्ट्राच्या रिटेल एक्सपोला चांगला प्रतिसाद
पनवेल, दि.29 (वार्ताहर) ः बँक ऑफ महाराष्ट्र, नवीन पनवेल शाखेने रिटेल एक्सपोचे नुकतेच आयोजन केले. ह्या कर्ज मेळाव्यास नवी मुंबई झोनचे झोनल मॅनेजर मिलिंद घारड, मुख्य प्रबंधक, महेश कुर्हेकर, चंदन कुमार व शाखा प्रबंधक, रत्ना रामगावकर व प्रथमेश मलाईकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलाने होऊन मान्यवरांचे स्वागत बँकेच्या शाखा प्रबंधक, रत्ना रामगावकर यांनी केले. उदघाटन प्रसंगी नवी मुंबई झोनचे, झोनल मॅनेजर, मिलिंद घारड म्हणाले की, बँक ग्राहकांची आर्थिक मदत करण्यासाठी ह्या कोरोनाच्या काळात पुढे येऊन बँकेने कर्ज मेळाव्याचे आयोजन केले आहे. अश्या कर्ज मेळाव्यामुळे अर्थव्यवस्थेला सुद्धा चालना मिळणार आहे. तरी बँकेने आयोजित केलेल्या कर्ज मेळाव्याचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले. याप्रसंगी बँकेचे ग्राहक डिमरी, अनिकेत बहाडकर व स्वप्नील जाधव याना तात्काळ कर्ज मंजूर करून मा. मिलिंद घारड, झोनल मॅनेजर यांच्या शुभहस्ते कर्ज मंजुरी पत्र देण्यात आले. कर्ज मेळाव्यास अशोक दळवी, राजपुरोहित, सी.ए. कार्तिक अग्रवाल, बँकेचे डी.एस.ए. प्रदीप देशमुख, अग्रवाल व ग्राहक वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन अरविंद मोरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता श्री कीर्थना, अरविंद मोरे, सीमा मराठे, आकाश सिरवय्या, वामन गायकवाड व सतीश पारधे यांनी अथक परिश्रम घेतले.