कडाक्याच्या थंडीत जनतेसाठी पहारा देणार्या पोलीस कर्मचार्यांना राजे प्रतिष्ठान तर्फे चहा – केक वाटप.
पनवेल, दि.31 (वार्ताहर) ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक पोलीस कर्मचार्यांनी कर्तव्य बजावत असताना कुटुंबाला स्वतः पासून दूर ठेवलं आहे. अनेक पोलीस बंधू – भगिनी कोरोना काळापासून एक दिवस देखील सुट्टी न घेता कर्तव्यावर हजर आहेत. त्यातच आता 31 डिसेंबर साजरा करण्यासाठी अनेक जण घराबाहेर पडत आहेत यामुळे कुठे गैरप्रकार घडू नयेत यासाठी पोलीसांचा जागता पहारा सुरू आहे.
कडाक्याच्या थंडीत पहारा करणार्या पोलीस बांधवाना श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेमार्फत महाराष्ट्र सहचिटणिस केवल महाडिक यांच्या संकल्पनेतून चहा- केकचे वाटप करण्यात आले. यावेळी नवीन पनवेल अध्यक्ष संतोष शिवदास आमले, कु.ओमकार महाडिक, कु.अनुराग आमले, कैलास रक्ताटे, युवराज तावरे कु.करण तावरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.