स्वाभिमानी रिपब्लिकन युथ पक्षाने केले आदिवासी कुटूंबियांचे सांत्वन
पनवेल, दि.3 (वार्ताहर)- स्वाभिमानी रिपब्लिकन युथ पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली पेण मध्ये घडलेल्या एका आदिवासी कुटुंबातील अल्पशा मुलीवर( वय-३वर्ष) आरोपी( आदेश मधुकर पाटील) या नराधमाने त्या छोट्या मुलीवर बलात्कार करून, तेवढे करूनही न थांबता तिला जीवे मारण्यात आले. या प्रसंगी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्या कुटुंबास भेट देऊन त्यांचे सांत्वन केले.
पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे म्हणाले की, आदिवासी कुटुंबातील या अल्पशा मुलीवर या नराधमाने केलेल्या कृत्याचा तिचा बलात्कार करून खून केला. याचा आम्ही पक्षाच्या वतीने निषेध करत आहोत व जो पर्यंत या कुटुंबाला न्याय मिळवून देत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही व त्या नराधमाला फाशी मिळेपर्यंत आमचा व आमच्या पक्षाचा खंबीर पाठिंबा देण्यात येणार आहे असे आश्वासन दिले, त्यावेळी उपस्थित पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष. महेश साळुंखे, कार्याध्यक्ष- विजय धोत्रे, जिल्हा युवा अध्यक्ष- सागर जाधव, पनवेल शहर अध्यक्ष-प्रकाश जाधव, पेण तालुका अध्यक्ष- अमित कांबळे, पेण शहर अध्यक्ष- नागेश सुर्वे, युवा अध्यक्ष- समीर घायतले, नरेश भालेराव, मनोज पाटील, सुनील गायकवाड,प्रणव गायकवाड, अविनाश अडागळे, तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(अ) पक्षाचे पेण तालुका अध्यक्ष- चिंतामण कांबळे, सरचिटणीस- विजय अडसुले, व महाराष्ट्रचे ख्यातनाम गायक- आनंद शिंदे यांचे पटशिन्य शैलेश भोसले व पक्षातील सर्वं कार्यकर्ते उपस्थित होते.