इंजिनियर ज्युसवाला बनला विचुंब्यामधील चर्चेचा विषय
पनवेल, दि.3 (वार्ताहर)- पनवेलजवळील नव्याने विकसित असलेल्या विचुंबे या विभागात इंजिनियरिंग शिक्षण घेतलेल्या दोघा मराठी बंधुंनी इंजिनियर ज्युसवाला हा नवीन व्यवसाय नुकताच सुरू केला असून या व्यवसायाबरोबर ग्राहकांनी त्यांच्या तब्येतीस आवश्यक असणारा कोणता ज्युस घ्यावा याचे मार्गदर्शनसुद्धा ते करीत असल्याने विचुंबे परिसरात मोहिते बंधू हे अल्पावधितच चर्चेचा विषय बनले आहेत. मुंबईतील सायन या ठिकाणी मुळ वास्तव्यास असलेले ललित आणि रोहित मोहिते काही वर्षांपूर्वी विचुंबे येथे राहण्यास आले. दरम्यानच्या काळात इंजिनियरींगचे शिक्षण घेवून दोन वर्षे नोकरी न मिळाल्यामुळे व लॉकडाऊनच्या काळात या दोन भावंडांनी स्वतःचा ज्युसचा व्यवसाय सुरू केला आहे. विचुंबे गावात सुरू केलेल्या ज्युस सेंटरला त्यांनी इंजिनियर ज्युसवाला असे नाव…