400 वर्षीय पुरातन असलेले चांद्रसेनिय कायस्थ प्रभु समाजाचे लक्ष्मी नारायण मंदिर पनवेलची वाढविणार शोभा
पनवेल, दि.8 (संजय कदम) ः चांद्रसेनिय कायस्थ प्रभु समाजाचे 400 वर्षीय पुरातन असलेले लक्ष्मी नारायण मंदिराचा आता जिर्णोद्धार होत असून त्याच्या आगळ्या वेगळ्या अध्यात्मिक रुपामुळे पनवेलमध्ये हे मंदिर म्हणजेच पनवेलची शोभा वाढविणारे देवस्थान ठरणार आहे.
शहरातील मध्यवर्ती ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज रोडवर लक्ष्मी नारायण मंदिर असून 400 वर्षीय पुरातन असे मंदिर असल्याने त्याचा जिर्णोद्धार करण्याचा संकल्प कमिटीने घेतला. यावेळी त्यांनी समाजाकडून देणगी व इतरांकडून मदत घेण्याचे ठरविले. परंतु पनवेलमधील सुप्रसिद्ध उद्योजक राजू गुप्ते यांच्या मातोश्री कांता कृष्णकांत गुप्ते यांनी सदर मंदिराचा जिर्णोद्धार आपल्या मार्फत व्हावा असे त्यांचे सुपूत्र राजू गुप्ते यांना सांगितले. त्य…
