“स्वामी विवेकानंद जयंती निमित्त रोटरी युथ फेस्टिव्हलचे आयोजन”
स्वामी विवेकानंद यांच्या १५८ व्या जयंती आणि राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून,
रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३१३१ युथ टीम आणि डिस्ट्रिक्ट मधिल २१ क्लब एकत्र येऊन रोटरी युथ लीडरशिप अवॉर्ड (Ryla) या उपक्रमाअंतर्गत १० जानेवारी ते १६ जानेवारी पर्यंत रोज सायंकाळी ७ ते ८.३० या वेळेत युवक व विद्यार्थांबरोबरच सर्वांसाठी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
या व्याख्यानमालेसाठी देशातील विविध ठिकाणांवरुन व्याख्याते स्वामीजींचे विचार, त्याची भाषणे व त्यांचे किस्से तसेच त्यांचे संपूर्ण जीवनमान यांचा उलघडा करणार आहेत.
या व्याख्यानमालेसाठी देशातील अनेक राज्यांबरोबरच काही इतर देशातील विध्यार्थी व युवकांनीही आपला सहभाग नोंदवला आहे.
या युथ फेस्टिवल मध्ये इयत्ता ६वी ते ८वी आणि ९वी ते १२वी या दोन गटाम…