राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक कोटकतर्फे कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित. पनवेल / प्रतिनिधी : सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारे व राजकीय क्षेत्रात कार्यरत असणारे तसेच पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय व डॅशिंगपणे कार्य करणारे राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक यांना कोटक लाईफ इन्शुरन्सच्या वतीने कोरोना योद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. वाशी येथील तुंगा हॉटेल येथे सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात नवी मुंबईमधील कोरोना काळात जनतेसाठी निःस्वार्थीपणे कार्य करणाऱ्या समाजसेवकांचा कोटक लाईफ इन्शुरन्सतर्फे कोरोना योद्धा पूरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सदर पुरस्कार सोहळ्यास चीफ मॅनेजिंग पार्टनर अनिता शर्मा, डेप्युटी व्हाईस प्रेसिडेंट गणेश डोळस, विभाग व्यवस्थापक जयदीप गुप्ता, शाखा व्यवस्थापक अभिजित पाटील, डेप्युटी व्हाईस प्रेसिडेंट धवल आचार्य यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.