कार्यसम्राट नगरसेवक राजू सोनी यांनी करून दिली तातडीने रस्त्याची दुरुस्ती
पनवेल, दि.16 (वार्ताहर) ः पनवेल महानगरपालिकेचे कार्यसम्राट नगरसेवक राजू सोनी यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील रस्त्याची दुरुस्ती तातडीने करून घेतली आहे.
येथील ब्रिज खाली रस्त्यावर भरपूर खड्डे पडले होते. तरी ट्राफिक पोलीस व लक्ष्मी वसाहत मधील नागरिकांनी संकट मोचन मा प्रभाग ड समिती नगरसेवक राजू सोनी यांना फोन करून बोलविले व त्यांना रस्त्याच्या खड्ड्यांबाबत माहिती दिली. तातडीने त्यांनी याबाबत पाहणी करून स्वतःची माणसे लावून रातोरात सर्व खड्डे सिमेंट काँक्रेट करून भरून घेतले त्याबद्दल त्यांना सर्व वाहतूक प्रकारच्या वाहतूकदारांनी ट्रॅफिक पोलिसांनी व लक्ष्मी वसाहत मधील नागरिकांनी त्यांचे आभार मानले सगळ्यांनी त्यांना धन्यवाद दिले आहेत.
