मोटार सायकलची चोरी
पनवेल, दि.16 (वार्ताहर) ः शहरातील आशियाना सोसायटी बाहेरील रस्त्यावर उभी करून ठेवलेली मोटार सायकल अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना घडली आहे.
प्रथमेश देशपांडे यांनी त्यांची 20 हजार रुपये किंमतीची सुझुकी कंपनीची मोटार सायकल क्र.एमएच-06-बीवाय-4640 ही सोसायटीच्या बाहेरील रस्त्यावर उभी करून ठेवली असता अज्ञात चोरट्यांनी सदर मोटार सायकल चोरुन नेली आहे. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.