लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी राममंदिर निर्माणासाठी दिलेल्या निधीबद्दल राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे सत्कार.
पनवेल / प्रतिनिधी : अयोध्येत प्रभु श्रीराम मंदिराला प्रारंभ झाला आहे. सर्व भारतीयांच्या सहभागाने हे भव्य ‘श्रीराम मंदिर’ साकारणार आहे. त्या अनुषंगाने देशव्यापी संपर्क व निधी संकलन अभियान सुरु झाले असून यासाठी पनवेलकरांचा अभिमान लोकनेते माजी खासदार सन्मा. रामशेठ ठाकूर साहेबांच्या वतीने भव्य राममंदिर निर्माण निधी संकलन समितीकडे रु.१ कोटीचा धनादेश निधी स्वरुपात सुपूर्द करण्यात आला. पैसा सर्वांकडे असतो आजही अनेक पैसेवाले नेते पनवेल किंबहुना रायगड परिसरात आहेत मात्र चांगल्या कार्यासाठी व आपला पैसा सत्कर्म लावण्याची व दानशूरता फक्त लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांकडेच आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांनी राममंदिर निर्माणसाठी देण्यात आलेल्या निधीबद्दल श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठानतर्फे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक, नवीन पनवेल शहर अध्यक्ष संतोष आमले, उपाध्यक्ष विजय दुन्द्रेकर, युवराज तावरे आदी उपस्थित होते.