अल्पवयीन मुलीचे अपहरण
पनवेल, दि.18 (वार्ताहर) ः एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची घटना कामोठे वसाहतीमध्ये घडली आहे.
सदर मुलगी ही दुकानावरुन शालेय साहित्य घेवून येते असे सांगून घरातून बाहेर पडली ती अद्याप घरी परत न आल्याने तिला अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी पळवून नेल्याची तक्रार कामोठे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. ती रंगाने गोरी, उंची अंदाजे 5 फूट, अंगाने सडपातळ, मध्यम बांधा, डोळे काळे केस काळे व लांब असून अंगात निळ्या रंगाची ट्रॅक पॅन्ट व राखाडी रंगाचा टॉप घातला आहे. या मुलीबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास कामोठे पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.
