सहा कोटी रुपयांचे बनावट किसान विकास पत्र व राष्ट्रीय बचत पत्र तयार करणारी टोळी पनवेल पोलिसांनी केली जेरबंद
पनवेल दि 22(वार्ताहर)दिनांक २०/०१/ २०२१ रोजी गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, भारतीय डाक विभागाचे किसान विकास पत्र व राष्ट्रीय बचत पत्र बनावट तयार करुन ते खरे असल्याचे भासवुन बॅकेमध्ये गहाण ठेवुन कर्ज घेणा-या टोळीतील काही ईसम H.D.F.C. BANK, पनवेल येथे येणार आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सहा. पोलीस निरीक्षक श्री.राहुल सोनवणे, पोउपनिरी सुनिल तारमळे व गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार यांनी H.D.F.C. BANK, पनवेल येथे सापळा लावुन दोन संशईतास ताब्यात घेतले त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचे जवळ भारतीय डाक विभागाची ०२ बनावट किसान विकास पत्र व ०७ बनावट राष्ट्रीय बचत पत्र असे एकुण ९ बनावट दस्तऐवज मिळुन आले. सदर इसमांना पनवेल शहर पोलीस ठाणे येथे आणुन त्यांच्याकडे कौशल्यपुर्ण तपास करुन सदर किसान विकास पत्र व राष्ट्रीय बचत पत्र हे बनावट असल्याबाबत भारतीय डाक विभागाकडुन पडताळणी करुन घेतली. सदरचे किसान विकास पत्र व राष्ट्रीय बचत पत्र हे बनावट असल्याने सदर इसमांविरुध्द व त्यांचे साथीदारांविरुध्द पनवेल शहर पोलीस ठाणे येथे ५२/२०२० भादवि कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरचा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने मा.पोलीस आयुक्त श्री.बिपिन कुमार सिंह, मा. पोलीस सहआयुक्त डॉ.जय जाधव, मा. अपर पोलीस आयुक्त डॉ. बी. जी. शेखर पाटील, मा.पोलीस उप आयुक्त श्री.शिवराज पाटील व मा. सहा पोलीस आयुक्त, श्री नितीन भोसले-पाटील यांनी सदर गुन्हयाचा सखोल तपास करण्याबाबत सुचना दिल्या आहेत.
गुन्हयाची उकल :
वरिष्ठांनी दिलेल्या सुचनांच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे व पोनि (गुन्हे) संजय जोशी यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक श्री.राहुल सोनवणे, पोउपनिरी सुनिल तारमळे व गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार यांनी सदर गुन्हयाचा कौशल्यपुर्ण तपास करुन खालील आरोपींना अटक केली आहे. सदर आरोपींपैकी मुख्य आरोपी बाबाराव गणेशराव चव्हाण हा पुर्वी भारतीय डाक विभागात नांदेड येथे पोस्ट मास्तर ( डाक पाल) पदावर नोकरीस होता. तेथे त्याने हेराफेरी केल्याने त्याचेवर फौजदारी कारवाई करुन त्यास निलंबीत करण्यात आले आहे. त्याला पोस्ट खात्याचे कामकाजाची पुर्ण माहीती असल्याने त्याने व त्यांचे इतर साथीदारांसह बनावट किसान विकास पत्र व राष्ट्रीय बचत पत्रे तयार करुन ती विविध पतसंस्था व बँकांमध्ये गहाण ठेवुण त्याबदल्यात कर्ज घेवुन विविध पतसंस्था व बँकांची फसवणुक केली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच सदर आरोपीतां कडून खालील प्रमाणे बनावट दस्तऐवज व मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे. तपास अधिकारी- सहा पोलीस निरीक्षक श्री .राहुल सोनवणे.
अटक आरोपी :-
१) बाबाराव गणेशराव चव्हाण, वय २४ वर्षे, रा.मु. पो.बोलसा खुर्द, ता.उमरी, जि.नांदेड २) श्री.सुप्रभात मल्लनप्रसाद सिंग, वय ५० वर्ष, धंदा-व्यापार, राहणार एच ४, रूम नं १००३,
व्हॅलीशिल्प,सेक्टर ३६,खारघर, नवीमुंबई. ३) श्री.संजय कुमार अयोध्या प्रसाद, वय ४६ वर्षे, धंदा-नोकरी, राहाणार ए ७०२, साईक्रिस्टलप्लॉटनं ४५,
सेक्टर ३५ डी, खारघर, नवीमुंबई.
४) दिनेश रंगनाथ उपाडे, वय ३९ वर्षे, धंदा कॉन्ट्रॅक्टर, रा. रुम नं. ४९, सिंधी कॅम्प, इंदिरानगर, चेंबुर मुंबई. सदर आरोपींना दि. २१/०१/ २०२१ रोजी अटक केली असुन दि. २७ / ०१/२०२१पावेतो पोलीस
कोठडी मिळाली आहे.
हस्तगत माल
१) ३,००,००,०००/- रू.कि.चे भारतीय डाक विभागचे एकुण ६ बनावट किसान विकास पत्र प्रत्येकाची किंमत रुपये
५०,००,०००/- रुपये