महाराष्ट्र नवनिर्माण सेना पनवेल शहर अध्यक्ष कै. श्री. शितल चंद्रकांत सिलकर यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, पनवेल शहरातर्फे रक्तदान शिबिर
पनवेल/वार्ताहर: महाराष्ट्र नवनिर्माण सेना पनवेल शहर अध्यक्ष कै. श्री. शितल चंद्रकांत सिलकर यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, पनवेल शहरातर्फे रक्तदान शिबिर दि. 26 जानेवारी 2021 रोजी आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून पोलीस उपायुक्त श्री. शिवराज पाटील साहेब, मनसे पक्षाचे नेते नितीन सरदेसाई, शिरीष सावंत, आदित्य शिरोडकर आदी उपस्थित होते. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष अतुल भगत, विद्यार्थी सेनेचे जिल्हा अध्यक्ष अक्षय काशिद, जिल्हा उपाध्यक्ष अतुल चव्हाण,रायगड जिल्हा संघटक गोवर्धनभाई पोलसांनी, जिल्हा सचिव केसरीनाथ पाटील, तालुका अध्यक्ष अविनाश पडवळ,तालुका सचिव अमोल पाटील, विधानसभा सचिव प्रतिक वैद्य, शहर उपाध्यक्ष संदीप पाटील, मंदार पाटणकर,प्रकाश लाड,रुपेश शेटे संजय मुरकुटे,नयन मयेकर,केदार सोमण,सिद्धेश खानविलकर, गणेश गायकर,प्रथमेश सोमण, अवधूत ठाकूर,आकाश घाटे, महिला आघाडीच्या वर्षा पाचभाई, प्रीती खानविलकर, तेजस्विनी ढवळे व इतर पदाधिकारी, महाराष्ट्रसैनिक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष अनिमेष ओझे, शहर उपाध्यक्ष ऍड. अक्षय जोशी, शहर सचिव आकाश दलाल, विभाग अध्यक्ष अभि रिंगे, आकाश गाडे, प्रतिक पाटील, हिमांशू पाटील, प्रभजन गाडगीळ, सौरभ रामधरणे व कार्यकर्ते यांनी केले.
सदर रक्तदान शिबिरात एकूण 81 रक्तदात्यांनी रक्तदान केले.