पनवेल शहर पोलिसाने फसवणूक करणाऱ्या गुन्यागाराला केली अटक
वार्ताहर/प्रतिनिधी: पनवेल शहर पो स्टे गु र न ४००/२०२० , भादंवि कलम ४२०,४०६ तील फिर्यादी संजय छेडीलाल रावत याचा मोबाईल आरोपित विजय राकेश सिंग, वय २५ वर्ष , रा. सुरतपूर गाव , जि. अलिगड , दिल्ली याने बॅलन्स सम्पला आहे असे सांगून फिर्यादी यांचा मोबाईल घेऊन फिर्यादी यांचे पेटीएम अकाउंट वरून स्वतःचे अकाउंट वर ४०,००० /- रुपये ट्रान्सफर ट्रान्फर करून घेऊन फिर्यादी यांची फसवणूक केली आहे. म्हणून वरील प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता… सदर गुन्हा केल्यापासून आरोपी हा फरार होता. सदर गुन्ह्यात तांत्रिक तपास व गोपनीय बातमीदार यांचे आधारे गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोउपनिरी सुनील तारमळे व अंमलदार यांनी सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी विजय राकेश सिंग, वय २५ वर्ष , रा. सुरतपूर गाव , जि. अलिगड , दिल्ली यास वाघोली गाव , ता. हवेली , जिल्हा पुणे ग्रामीण येथून ताब्यात घेतले आहे. अटक आरोपी यास दिनांक १/०२/२०२१ पावेतो पोलीस कोठडी मिळाली आहे.