महिलेचा आढळला मृतदेह
पनवेल, दि.5 (वार्ताहर) ः पनवेल परिसरात एका महिलेचा मृतदेह आढळून आला असून तिच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत.
सदर महिलेचे अंदाजे वय 30 ते 35 वर्षे, रंगाने सावळी, केस काळे, उंची 4 फूट 5 इंच, चेहरा गोल असून अंगात फिक्कट पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. या महिलेबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी 27452333 किंवा सहा.पो.नि.राजेंद्र जाधव यांच्याशी संपर्क साधावा.