महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाच्या पनवेल पोलिस पाटील अध्यक्षपदी मिलिंद पोपेटा यांची निवड
पनवेल दि.07 (वार्ताहर): महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाचे राज्य सचिव कमळाकर मांगले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पनवेल पोलीस पाटील अध्यक्ष निवड करताना सर्वानुमते मिलिंद जोमा पोपेटा (पो.पा.शिवकर,पनवेल ) यांची निवड करण्यात आली.
तसेच पनवेल तालुका उपाध्यक्ष पदी संतोष गायकर (पो.पा. भिंगारवाडी), पनवेल तालुका सचिव पदी ृकुणाल लोंढे (पो.पा.करंजाडे), पनवेल तालुका सहसचिव पदी स्मिता म्हात्रे (पो.पा.वावंजे), पनवेल तालुका खजिनदार पदी प्रमोद नाईक (पो.पा.पारगाव डुंगी) यांची निवड करण्यात आली आहे. सदर कार्यक्रम पनवेलच्या शासकीय विश्रामगृहामध्ये आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमा प्रसंगी प्रमुख पाहुणे हरिश्चंद्र दुदुसकर (रायगड जिल्हा अध्यक्ष). दिनेश पाटील (खालापूर पोलीस पाटील), मिनाक्षीताई पाटील (कुंडेव्हाळ पो.पा.), सौ.सुगंधा ताई पारधी (सांगुर्ली पो.पा.), विजय खुटले (पो.पा.नांदगाव), निलेश गायकर(पो.पा.तुरमाळे), एकनाथ पाटील(पो.पा.पळस्पे), प्रविण पाटील (कसळखंड पो.पा.), दिलीप खुटले.(चिंचवण पो.पा.), पांडुरंग जाधव (कोळखे पो.पा), वसंत पाटील (वडवली पो.पा.), शफिक शेख (वहाळ पो.पा), संदिप ठाकरे (नानोशी पो.पा) आदींसह या कार्यक्रमाला पनवेल तालुक्यातील पोलीस पाटील उपस्थित होते. फोटोःमहाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाच्या पनवेल पोलिस पाटील अध्यक्षपदी मिलिंद पोपेटा यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करताना मान्यवर
