लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त ७० सामाजिक उपक्रमांतर्गत आयोजित ऑनलाईन चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर.
राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे विजेत्यांना आकर्षक बक्षीसे देऊन केले सन्मानित.
पनवेल / प्रतिनिधी : श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे अध्यक्ष जितेंद्र खानविलकर उर्फ काकासाहेब, राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र संघटक प्रमुख अशोक शिगवण उर्फ अच्चूभाई, सरचिटणीस चंद्रकांत धडके उर्फ मामासाहेब, कार्याध्यक्ष प्रकाश कोळी, सचिव मंगेश लाड यांच्या आदेशाने व महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक यांच्या संकल्पनेतून लोकनेते आदरणीय रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यावर आधारीत चित्र ऑनलाईन काढण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यानुसार नवी मुंबई, पनवेल तालुका, रायगड, खालापूर व अन्य परिसरातून लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यावर आधारित काढलेली तब्बल ७० चित्रे पाठ्वण्यात आली होती. त्यानुसार राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे ४ उत्कृष्ट चित्रांची निवड करण्यात आली व यामध्ये प्रथम क्रमांक पनवेल येथील श्री कबीरानंद यांना तर द्वितीय क्रमांकाचे मानकरी धाकटा खांदा येथील विश्वास म्हात्रे तसेच तृतीय क्रमांक श्रेया दिपक वामन यांना जाहीर करण्यात आले. तसेच उत्तेजनार्थ म्हणून नवी मुंबईतील रहिवाशी शीतल बिडवई यांना बक्षीस जाहीर करण्यात आले. या चित्रकला स्पर्धांचे बक्षीस वितरण दिनांक ९ फेब्रुवारी २०२१ रोजी राजे प्रतिष्ठान कामगार सेना मुख्य कार्यालय येथे करण्यात आले. यावेळी रेनबो स्कुलच्या संस्थापिका आयेशा रणदिवे, महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक, नवीन पनवेल शहराध्यक्ष संतोष आमले, ओमकार महाडिक यांच्याहस्ते विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली.