औद्योगिक वसाहत परिसरातून अज्ञात चोरट्यांनी मोटारसाय केलीची चोरी
पनवेल दि.14 (वार्ताहर)- तळोजा औद्योगिक वसाहत परिसरातून अज्ञात चोरट्यांनी मोटारसायकलीची चोरी केल्याची घटना घडली आहे. फुलचंद परशुराम आडे (वय-47) यांची 20 हजारांची हिरोहोंडा स्प्लेंडर काळ्या रंगाची मोटारसायकल क्र.-एमएच 46 एएम 4753 हि दिपक फर्टिलायजरच्या गेट बाहेरील सर्व्हिस रोड लगत उभी करून ठेवली असता अज्ञात चोरट्यांनी सदर मोटारसायकल चोरून नेल्याची तक्रार तळोजा पोलिस ठाण्यात कऱण्यात आली आहे