मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांच्या वतीने ८ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन अनोख्या ढंगाने साजरा.
पनवेल/वार्ताहर:पनवेल मध्ये प्रभाग क्र १८ चे नगरसेवक तसेच मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांच्या वतीने *”ती” चा सन्मान* अनोख्या ढंगाने महिला दिन साजरा करण्यात आला.आजची स्त्री सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून वावरत आहे.सरकारी,निम सरकारी आणि खाजगी या सर्व क्षेत्रात स्त्रीयांचा कार्य अतुलनीय आणि उल्लेखनिय आहे.आशा सर्व पनवेल शासकीय विभागात ( पनवेल-नवीन पनवेल पोस्ट ऑफिस,पनवेल महानगरपालिका, सेतू कार्यालय,तहसील कार्यालय,उपजिल्हा रुग्णालय,UPHC-1,UPHC-2, पनवेल शहर पोलीस स्टेशन आणि ट्रॅफीक पोलीस )काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला.सन्मान पत्र,गुलाबाचे फुल आणि सॅनिटायजर देण्यात आले.या अनोख्या प्रकारे सन्मान केल्या बद्दल सर्व माता भगिनींनी नगरसेवक विक्रांत पाटील यांना धन्यवाद दिले.