अखिल भारतीय जनवादी महिला संघटना रायगड जिल्हा कमिटी तर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त चर्चा सत्रात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग.
उरण/प्रतिनिधी:10(विठ्ठल ममताबादे )जनवादी महिला संघटना गेली 40 वर्षे महिलांच्या विविध प्रश्नांवर सर्व जाती-धर्माच्या महिलांना संघटीत करून काम करीत आहे. महागाई, रेशन व्यवस्था, बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य, अत्याचारीत महिलांना न्याय देण्याचे काम, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या लढ्यात नेहमी अग्रेसर राहिली आहे.सद्य परिस्थितीत काम करत असताना, आज महिलांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे, रेशनकार्डवरील धान्य बंद (कमी) झालं, गॅस सिलिंडर भाव वाढले, पेट्रोल डिझेलचे भाव दररोज वाढत असल्याने वाहतूक खर्चात वाढ होत आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीतही झपाट्याने वाढ होत आहे.कांदे,भाज्या,डाळी या वस्तूंच्या प्रचंड प्रमाणात दरवाढीचा बोजा महिलांना सोसावा लागत आहे.केंद्रातील भा.ज.पा सरकार गरिबांना गरिब आणि श्रीमंतांना श्रीमंत करण्याची धोरणे राबवत आहे .ह्या जनविरोधी आणि महिलांविरोधी धोरणांना विरोध करण्यासाठी सरकारी धोरणाविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची आज गरज आहे.मोदी सरकार बहुमताच्या जोरावर कामगारविरोधी, शेतकरीविरोधी कायदे संसदेत पास करून घेत, उद्घाटन करून घेत आहे. जनतेने स्वतःच्या हक्कासाठी लढाई करु नये. म्हणून करोनाचे निमित्त पुढे करीत आहे.या सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सर्व जाती-धर्माच्या महिलांनी संघटित होऊन लढण्यासाठी जनवादी महिला संघटनेच्या वतीने एकत्र येण्याची गरज असल्याचे मत सामाजिक कार्यकर्त्यां हेमलता पाटील यांनी व्यक्त केले.
महिला दिनानिमित्त कामगार भवन, बोकडविरा, ता.उरण, जि.रायगड येथे महिलांच्या विविध समस्या विषयक चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सामाजिक कार्यकर्त्यां हेमलता पाटील यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.अमिता ठाकुर, ज्योती म्हात्रे, पुर्वा प्रशांत पाटील,डाॅ.वनिता पाटील. सुनंदा वाघमारे,अंजू साळवी, यांनीही यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले.सदर चर्चा सत्राला महिलांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असल्याचे दिसून आले.
सदर महिला दिन कार्यक्रम अर्थातच चर्चासत्र यशस्वी करण्यासाठी ज्योती म्हात्रे, अमिता ठाकुर, हेमलता पाटील, उषाताई म्हात्रे, निराताई घरत, ताराताई ठाकुर, लता पाटील, नयना म्हात्रे, वर्षा म्हात्रे, गिता पाटील, अपर्णा म्हात्रे, शारदा ठाकुर, जयवंत पाटील, सविता पाटील, सविता खारपाटील, बेबी कातकरी, बेबी गांवड, सुनंदा वाघमारे, रसिका पाटील, रुपाली पाटील, रजनी पाटील, प्रमिला म्हात्रे, छाया मढवी, जयश्री माळी, कुसुम ठाकुर, कमला म्हात्रे, हुसेना, मुमताज शेख, शुभांगी पालशेतकर या महिला भगिनींनी विशेष मेहनत घेतली.