महिलांनी आपल्या व्यक्तिमत्वासह स्वतःच्या आणि कुटुंबाच्या आरोग्यावर लक्ष द्यावे ः पोलीस उपायुक्त शिवराज पाटील
पनवेल, दि.10 (वार्ताहर) ः पनवेल तालुका पोलीस ठाणे अंतर्गत, वाकडी येथे निवारा केंद्राचे उद्घाटन पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांच्या हस्ते महिला दिनानिमित्त करण्यात आले. यावेळी पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीतील महिला पोलीस पाटील, वाकडी ग्रामपंचायत महिला सरपंच आणि महिला सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
तालुका पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अंमलदार आणि निसर्गप्रेमी रेस्क्यू टीम यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन भोसले पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर, पोलीस निरीक्षक अंकुश खेडकर यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि सरपंच कुंदा पवार, उपसरपंच अरुण पाटिल, रमेश पाटिल, नामदेव जमदाड़े यांच्यासह पोलिस पाटील, ग्रामस्थ उपस्थित होते. वाकड़ी बिट अंतर्गत पोलीस चौकित जवळपास 25 गावे तसेच 12 ते 13 वाड्या यांचा समावेश होतो. गेल्या कित्येक वर्षापासुन येथे चौकी नसल्याने नागरिकाना तक्रार देण्यास नेरे चौकीत जावे लागत असे. ही बाब पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांच्या लक्षात येताच त्यानी वाकड़ी येथे चौकी बांधण्यास सांगितले. वाकड़ी येथे यापूर्वी चौकीसाठी प्रयत्न करण्यात आले होते. मात्र पोलीस चौकी झाली नव्हती. वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र दौंडकर यानी पोलिसांसाठी आणि पोलिसांना निवारा गस्त व्हावी यासाठी प्रयत्न केले. यावेळी परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त, शिवराज पाटील यानी आपण आपले स्वास्थ चांगले ठेवले तर कुटुंबाचे स्वस्थ ठेवता येईल. महिलानी आपल्या व्यक्तिमत्वावर लक्ष द्या. स्वतःच्या आणि कुटुंबाच्या आरोग्यावर लक्ष द्या. आणि समाजासाठी काम करत राहा. महिला पोलीसांची कामगिरी वाखाणण्याजोगी असल्याचे सांगितले. पोलीस महिला ह्या कठिण परिस्थितीत काम करत आहेत. या पोलीस महिलाना नागरिकानी सहकार्य करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.
कोट
समाजातील काही प्रश्न, तक्रारी असतील तर या वाकडी चौकीद्वारे ते सोडविण्याचा प्रयत्न करावा. नागरिकाना पनवेलला जावे लागणार नाही याची पोलिसानी काळजी घ्यावी. सोशल मीडियाचा वापर आपली मुले, मुली कशासाठी करतात याकडे महिलांनी लक्ष देणे गरजेचे असल्याचे सांगितले. महिलानी पोलीस स्टेशनला महिला दक्षता कमिटी आहे, त्याची मदत घ्यावी. – शिवराज पाटील, पोलीस उपायुक्त