सेवानिवृत्त पोलीस उपअधिक्षक वसंतराव नलावडे यांचे दुःखद निधन
पनवेल, दि.11 (वार्ताहर) ः सेवानिवृत्त पोलीस उपअधिक्षक वसंतराव नलावडे यांचे पनवेल येथे अल्पशा आजराने दुःखद निधन झाले आहे.
सुरूवातीला त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक या पदावर कामकाजास सुरूवात केली. त्यानंतर महाड, उल्हासनगर, ठाणे (वर्तकनगर), न्हावा-शेवा पोलीस ठाणे आदी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात कार्यरत होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कर्जत येथे त्यांनी कामकाज पाहिले होते. त्यानंतर नागोठणे, धाटाव येथे पोलीस उपअधिक्षक म्हणून कामकाज पाहून ते सेवानिवृत्त झाले. त्यानंतर ते पनवेल येथे वास्तव्यास होते. त्यांचे नुकतेच अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सुना, नातवंडे, जावई असा परिवार आहे.