प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे नोकरीसाठी साखळी उपोषण.नोकरीत सामावून घेण्याची बेरोजगार प्रकल्पग्रस्तांची प्रमुख मागणी.
उरण दि 12(विठ्ठल ममताबादे )BPCL (भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड )ही केंद्र सरकारचा प्रकल्प उरण तालुक्यातील भेंडखळ ग्रामपंचायत हद्दीत कार्यरत असून या प्रकल्पासाठी येथील नागरिकांनी आपल्या पिक्त्या जमिनी BPCL प्रकल्पासाठी कवडीमोल भावात विकली. त्याबदल्यात नोकरीं व इतर आश्वासने BPCL तर्फे प्रकल्पग्रस्त बेरोजगार शेतकऱ्यांना देण्यात आली होती. मात्र या प्रकल्पाने अर्थातच या कंपनीने सर्व आश्वासने पाळले नाही. भेंडखळ गावात अजूनही अनेक बेरोजगार युवक आहेत त्यांना नोकरीत सामावून घेण्यात आलेले नाही. त्यामुळे हा स्थानिक भुमीपुत्रांचा अपमान असून भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड BPCL )ने या बेरोजगारांना नोकरीत त्वरीत सामावून घ्यावे यासाठी प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीतर्फे अध्यक्ष अनिल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली BPCL प्रशासनाला दि 1 मार्च 2021 रोजी अर्ज /निवेदन दिले होते.पण कंपनीने त्यावर कोणताही प्रतिसाद दिला नाही. कंपनी प्रशासन बेरोजगारांना कामांवर रुजू करून घेण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे कायदेशीर मार्गाने रीतसर अर्ज करून सुद्धा बेरोजगार प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळत नसल्याने प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने सोमवार दि 15/3/2021 पासून BPCL गेट समोर संपूर्ण कुटुंबासह बेमुदत साखळी उपोषण करणार असल्याची माहिती प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष अनिल ठाकूर यांनी दिली आहे.