प्रस्तावित ३०० एकर ग्रीन-पार्क प्रकल्पाला विरोध असल्या कारणाने तातडीने स्थगित करण्याची ऑल इंडिया सिफेरार्स अँड जनरल वर्कर्स युनियनची मागणी
पनवेल, दि.13 (वार्ताहर} अरबी समुद्रातील प्रस्तावित ३०० एकरचे ग्रीन-पार्क करण्याच्या प्रकल्पाला स्थानिक मच्छिमारांचा तीव्र विरोध असून, आमच्या युनियन तर्फे सुध्दा हिच मागणी करण्यात येत गा आहे की हा प्रकल्प तातडीने स्थगित करण्यात यावा. ग्रीन-पार्कमुळे समुद्रातील जैविकता नष्ट होणार असून समुद्रातील कोरल्स, वनस्पती, माशांचे प्रजनन क्षेत्र नष्ट होणार असल्याची माहिती समितीने दिली आहे. ग्रीन-पार्क प्रकल्प रद्द करा, हा स्थानिक भूमिपुत्रांचा नारा असून, सदर प्रकल्पाच्या विरोधात मच्छीमार समाज एकजुटला आहे. सरकारने ह्या विषयाची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे.
सदर परिसरात ४०० पेक्षा जास्त नौकाधारक असून पंचवीस हजार मच्छीमार मासेमारीतून आपली उपजीविका करतात. ह्या पार्कमुळे मच्छिमारांना जाण्या-येण्या पासून वंचित ठेवून त्यांना त्यांच्या रोजगारात अडथळा निर्माण होणार आहे. मच्छीमारांचे वेळ आणि पैशाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. कफपरेड कोळीवाडा धोक्यात येईल अशी भीती समस्त मच्छीमार बांधवांमध्ये आहे. मुंबईतले कोळीवाडे संपुष्टात आल्यास मुंबईची प्राचीन संस्कृती संपुष्टात येईल, म्हणून कोळीवाड्यांचे जतन हे सरकारचे सर्वप्रथम धोरण असले पहिजे हे असे अध्यक्ष संजयजी पवार यांचे यांचे ठाम मत आहे.
जर सरकार ह्या प्रकल्पावर ठाम असल्यास समुद्रात होणाऱ्या सर्व प्रकल्पाला मच्छिमार समाजाचा विरोध असल्या कारणाने युनियन अध्यक्ष संजय वासुदेव पवार आणि कार्याध्यक्ष अभिजीत दिलीप सांगळे यांच्या मार्फत राज्य सरकार कडे प्रकाल्प स्थगित करण्याची मागणी करण्यात आली आहे, तसे न झाल्यास तीव्र आंदोलन इशारा युनियन मार्फत देण्यात येतं आहे.