सोसायटी नाका परिसरात आढळला मृतदेह
पनवेल दि.२० (संजय कदम) : सोसायटी नाका परिसरात एका इसमाचा मृतदेह आढळून आला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलिस करीत आहेत.
सदर इसमाचे अंदाजे वय ३० ते ३५ वर्षे, उंची ५ फूट, रंग सावळा, डोळे काळे, चेहरा उभट, मध्यम बांधा, नाक सरळ, केस काळे वाढलेले, दाढी मिशीचे केस काळे असून उजव्या हाताच्या मनगटावर इंग्रजीत जे.के.बी. असे गोंदलेले व डाव्या हाताच्या मनगटावर ऊ जागृत राम असे गोंदलेले आहे. अंगात तांबड्या रंगाचा फूल बाह्यांचा शर्ट व काळ्या रंगाची फूल पॅंट घातलेली आहे. या इसमाबाबत कोणाला माहिती असल्यास पनवेल शहर पोलिस ठाणे दुरध्वनी-२७४५२३३३ किंवा सहा. पोलीस निरीक्षक शिवाजी हुलगे यांच्याशी संपर्क साधावा.