उड्डाणपुलाखाली आढळला मृतदेह
पनवेल, दि.26 (वार्ताहर) ः उड्डाणपुलाखाली एका इसमाचा मृतदेह आढळून आला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत.
सदर इसमाचे अंदाजे वय 50 ते 55 वर्षे, उंची 5 फूट 4 इंच, रंग सावळा, अंगाने सडपातळ, डोक्याचे व दाढीचे केस बारीक काळे पांढरे, नाक लांब, चेहरा उभट असून, अंगात हिरव्या रंगाचा टी-शर्ट त्यावर पांढर्या रंगामध्ये आडव्या पट्ट्या तसेच डाव्या बाजूस जी-91 असे प्रिंट आहे व खाकी रंगाची बरमोडा पॅन्ट घातलेली आहे. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी 27452333 किंवा सहा.पो.निरीक्षक शिवाजी हुलगे यांच्याशी संपर्क साधावा.