नराधम पित्याने केले होते स्वतःच्या दोन्ही मुलींवर लैंगिक अत्याचार
पनवेल, दि.1 (वार्ताहर) ः पनवेल जवळील उलवे भागात राहणार्या एका नराधम पित्याने आपल्या 13 वर्षांच्या मुलीसोबत अश्लिल चाळे करुन तिचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला असतानाच याच नराधम पित्याने आपल्या दुसर्या मुलीवर देखील लैंगिक अत्याचार केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे एनआरआय पोलिसांनी या नराधम पित्यावर बलात्कार आणि पोक्सो कलमाखाली दुसरा गुन्हा दाखल केला आहे.
उलवे भागात राहणार्या या नराधमाच्या पत्नीचे निधन झाल्याने तो आपल्या तीन मुलींसोबत उलवे भागात राहण्यास होता. मात्र, वयात येत असलेल्या आपल्याच मुलींवर त्याची वाकडी नजर पडली. त्यामुळे त्याने काही महिन्यांपासून आपल्या सर्वात लहान असलेल्या 13 वर्षाच्या मुलीवर वाईट नजर टावून तिच्यासोबत आश्लल चाळे करण्याचा प्रयत्न सुरु केला होता. मात्र, पिडीत मुलीने त्याला विरोध करुन पोलिसांकडे तक्रार करण्याची धमकी दिल्यानंतर या नराधम बापाने सदर मुलीला लाकडी बांबुने जबर मारहाण केली होती. त्यामुळे पिडीत मुलीने घरातून बाहेर पळ काढत नेरुळ रेल्वे स्टेशन गाठले होते. त्यानंतर नेरुळ पोलिसांनी पिडीत मुलीला नेरुळ रेल्वे स्टेशन मधून ताब्यात घेऊन तिच्याकडे विचारपूस केल्यानंतर वडिलांकडून होत असलेल्या अत्याचाराची माहिती तिने दिली होती. त्यानंतर एनआरआय पोलिसांनी पिडीत मुलीच्या नराधम बापावर विनयभंग आणि पोक्सो कलमाखाली गुन्हा दाखल करुन 25 मार्च रोजी त्याला अटक केली आहे. त्यानंतर पोलिसांनी सदर प्रकरणाचा पुढील तपास करण्यासाठी आरोपीच्या दुसर्या मुलींकडे विचारपूस केल्यानंतर त्याच्या दुसर्या मोठ्या मुलीने देखील तिच्यावर वडिलांनी अनेकवेळा लैंगिक अत्याचार केल्याची माहिती दिली. घाबरुन सदर प्रकाराची माहिती कुणाला दिली नसल्याचे तिने सांगितल्यानंतर एनआरआय पोलिसांनी सदर नराधम पित्यावर बलात्कार आणि पोक्सो कलमाखाली दुसरा गुन्हा
