पनवेल रेल्वे सुरक्षा बलाकडून 3 लाख 47 हजार रुपयांची 227 अवैध तिकिटे जप्त
पनवेल, दि.5 (वार्ताहर) ः पनवेल रेल्वे सुरक्षा बळ आणि सीआयबीने संयुक्त कारवाई करीत बेलापूर मधून अवैध ई-तिकीट विक्री करणार्या व्यक्तीला पकडून 3 लाख 47 हजार रुपये किमतीची 227 तिकिटे जप्त केल्याने रेल्वेची अवैध तिकीट विक्री करणार्यांना मोठा झटका बसला आहे.
रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकार्यांना नवी मुंबई परिसरात अवैध ई-तिकीट विक्री केली जात असल्याची खबर मिळाल्याने सीआयबी आणि रेल्वे सुरक्षा बळाचे वरिष्ठ निरीक्षक जसबीर राणा यांनी टिम बनवून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शॉप नंबर 2 मातोश्री निवास प्लॉट नंबर 367 सेक्टर 20 बेलापुर येथे रात्री 12 वाजता धाड टाकली. त्याठिकाणी मनोहर मेश्राम, वय 28 वर्ष, राहणार शॉप नंबर 2 मातोश्री निवास प्लॉट नंबर बी-67 सेक्टर 20 बेलापुर हा अवैध ई-तिकीटे बनवून गरजूंना जास्त किमतीला विकत असल्याचे आढळून आले. रेल्वेचा कोणताही तिकीट विक्रीचा परवाना नसताना मनोहर मेश्राम याचेकडे यावेळी 80 आरक्षित ई- तिकीटे किंमत 152006.50 तसेच 147 नग वापरलेली आरक्षित ई-तिकीटे किंमत 191068.7 रुपये अशी एकूण 227 नग तिकीटे ज्यांची किंमत 343075.2 रुपये आहे. तिकीटे काढण्यासाठी वापरण्यात येणारा त्या व्यक्तीचा एक जुना मोबाईल (डर्राीीपस च31), 01 मोबाइल (ीशवाळ 8अ), अलशी कंपनीचा 01 मॉनिटर, 01 ूशलीेपळल कंपनीचा सीपीयू, की बोर्ड, माऊस व लरपपेप कंपनीचा प्रिंटर जप्त करण्यात आला. रेल्वे सुरक्षा बळ पनवेल येथे गुन्हा गुन्हा रजि. क्र.79/2021 ण/ड-143 ठश्रू. अलीं अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आले आहे. उपनिरीक्षक रेनू पटेल वरिष्ठ निरीक्षक जसबीर राणा यांचे मार्गदर्शनाखाली अधिक तपास करीत आहेत.