सत्यमेव जयते ट्रस्ट इंडिया कडून आरोग्य मंत्री, डॉ. हर्षवर्धन यांना पत्राद्वारे महाराष्ट्रात कोविड -१९ प्रतिबंध लस तातडीने पुरवठा करण्याचीकरण्यात आली मागणी
पनवेल दि.08 (संजय कदम):सत्यमेव जयते ट्रस्ट इंडिया कडून आरोग्य मंत्री, डॉ. हर्षवर्धन यांना पत्राद्वारे महाराष्ट्रात कोविड -१९ प्रतिबंध लस तातडीने पुरवठा करण्याची मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्रात कोविड -१९ प्रतिबंधक लस त्वरित पुरवठा करणे हे अत्यंत गरजेचे असल्याचे दिसून येते. महाराष्ट्रातील अनेक जिल्हे एक-दोन दिवसात कोविड -१९ लसीचा साठा संपेल.
बुधवारी सकाळी राज्यात सुमारे १४ लाख लस डोस असल्याची माहिती महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत दिली. वेळापत्रक आणि उपलब्धतेबाबत स्पष्टीकरण दिल्यास महाराष्ट्र एका दिवसात पाच लाख लस सहजपणे देऊ शकतो आणि दर आठवड्याला ४० लाख कोविड -१९ लस साठा मिळाल्यास ते दररोज ६ लाख लसीकरण करु शकतील. तसेच ट्रस्टच्या अध्यक्षा शितल शिवाजीराव मोरे यांनी विशेष भर १८ वर्षांवरील लोकांना कोविड -१९ प्रतिबंधक लस देण्याची परवानगी देण्यात यावी ह्यावर दिला आणि हे किती महत्त्वाचे आहे यामुळे तरुणांचे विषाणूजन्य संसर्गाचा प्रादुर्भाव होण्यापासून संरक्षण होईल. गेल्या काही दिवसांत तरुण गटात ॲक्टिव रूग्णांची मोठी वाढ झाली आहे आणि दुर्दैवाने मृत्यूही.
तसेच महाराष्ट्रामध्ये वैद्यकीय ऑक्सिजनची कमतरता असून, फार बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे या साथीच्या आजारात शेजारचे राज्य न वापरत असलेल्या ऑक्सीजन महाराष्ट्राला पाठवून मोलाची मदत करू शकता अस मत सरचिटणीस अभिजीत दिलिप सांगळे यांनी व्यक्त केले. सत्यमेव जयते ट्रस्ट इंडियाकडून केले गेलेल्या मागणीला तातडीने योग्य प्रतिसादाची अपेक्षा संस्थापक संजय वासुदेव पवार यांना आहे.
