लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे दुचाकीचालकांना देण्यात आले मोफत पेट्रोल.
पनवेल / प्रतिनिधी : सर्वसामान्य लोकांना भेडसावणारी पेट्रोल डिझेल दरवाढीच्या समस्येची जाणीव ठेवूनच माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले संस्थापक अध्यक्ष असलेल्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे अध्यक्ष जितेंद्र खानविलकर उर्फ काकासाहेब यांच्या मागर्दर्शनानुसार व महाराष्ट्र संघटक अशोक शिगवण उर्फ अच्चूभाई, उपाध्यक्ष नारायण कोळी, महाराष्ट्र सरचिटणीस चंद्रकांत धडके मामा व कार्याध्यक्ष प्रकाश कोळी यांच्या सोबतीने महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक यांच्या संकल्पनेनुसार लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या ७० व्या वाढदिवसा निमित्त राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे दिनांक १३ एप्रिल २०२१ रोजी संध्याकाळी ४.०० वाजता विश्राळी नाका येथील शाहिद भोसले पेट्रोलपंप येथे सर्वसामान्य नागरिकांच्या दुचाकीत १०० रुपयाचे मोफत पेट्रोल भरून देण्यात आले. यावेळी दुचाकीचालकांना प्रतिष्ठानतर्फे कुपन देण्यात आले होते व कोरोनाबाबतचे सर्व नियम पाळून व गर्दी टाळून हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमास समाजसेवक तथा आशा की किरण फाउंडेशनचे बशीरभाई कुरेशी, राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे नवीन पनवेल अध्यक्ष संतोष आमले, उपाध्यक्ष विजय दुन्द्रेकर, सचिव सुरेश भोईर, कैलास रक्ताटे, ओमकार महाडिक, रहिस शेख यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.