देवदूतांवर नियतीने घातला घाला.मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर अपघात,पनवेल रुग्णवाहिका असोसिएशनचे अध्यक्ष श्री. सुशांत मोहिते यांचा मृत्यू
पनवेल/प्रतिनिधी :मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर किलोमीटर 8 च्या दरम्यान मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या स्विफ्ट टॅक्सीला कंटेंनरने मागून धडक दिली होती. त्याच दरम्यान तेथे पनवेल रुग्णवाहिका असोसिएशनचे अध्यक्ष श्री. सुशांत मोहिते वय – 26 व पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक तेजस कांडपिले व इतर 2 जण त्या अपघातात मदत करण्यासाठी आपली मर्सिडीज गाडी घेऊन थांबले असताना अचानक मागून आलेल्या आयशर टेम्पोने मर्सिडीजला धडक दिली. या धडकेत पनवेल रुग्णवाहिका असोसिएशनचे अध्यक्ष श्री. श्री. सुशांत मोहिते वय – 26 यांचा मृत्यू झालेला असून त्यांचेसह प्रथमेश बहिरा वय 24 यांचा देखील मृत्यू झाला आहे. हर्षद खुदकर हे जखमी झाले असून त्यांना MGM हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक तेजस कांडपिले हे या सुखरूप आहेत.
या मल्टी व्हेइकल अपघातातील इतर जखमींना पनवेलच्या अष्टविनायक हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.
या वेळी आय आर बी पेट्रोलिंग, महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा – पळस्पे, देवदूत, लोकमान्य हॉस्पिटलचे कर्मचारी, डेल्टा फोर्स यांनी मदत केली आहे.
अपघातात मदतीला थांबलेल्याचा अपघात होणं खूप दुःखद आहे. पनवेल ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात हा अपघात घडला आहे.