पनवेल परिसरातून 1 लाख 52 हजार रुपये किंमतीचा पानमसाला व सुगंधीत तंबाखू शहर पोलिसांनी केला हस्तगत ; 2 अटकेत
पनवेल, दि.20 (संजय कदम) ः महाराष्ट्र राज्यात गुटखा विक्रीस बंदी असतानाही बेकायदेशीररित्या गुटखा व पानमसाला व सुगंध सुपारी आणून त्याची विक्री करणार्या दोघांविरुद्ध पनवेल शहर पोलिसांनी अन्न सुरक्षा पथकाच्या माध्यमातून कारवाई करून त्यांच्याकडून जवळपास 1 लाख 52 हजार 672 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
तालुक्यातील उसर्ली येथील रेल्वे ट्रॅकच्या बाजूला असलेल्या चाळीत आरोपी निरु सुरज पाल (34) व शिवसेन संजीवन निर्मल (25) हे दोघे त्या ठिकाणी बेकायदेशीररित्या गुटखा, पानमसाला, सुगंधीत तंबाखू आदी पदार्थ आरोग्यास अपायकारक असतानाही लोकजिवीतास धोका निर्माण करणार्या प्रतिबाधीत अन्नपदार्थाची विक्री करण्याच्या उद्देशाने साठा करून ठेवत असल्याची माहिती वपोनि अजयकुमार लांडगे यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने सदर ठिकाणी छापा मारुन जवळपास 1 लाख 52 हजार 672 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्यांच्याविरोधात अन्न सुरक्षा मानदे अधिनियमन 2006 मधील कलम 26 (2) (आय), 26 (2) (आयव्ही), व कलम 27 (3) (डी), 27 (3) (ई), 59 (3) भादवीस कलम 188, 272, 273 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.